विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागलं आहे. तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारणही जोरात सुरू आहे. नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंना आणखी (Uddhav Thackeray) एक धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाकडून उमेदवारी केलेल्या भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालघरचे सहसंपर्क प्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने भारती कामडी यांना पालघरमधून तिकीट दिलं होतं. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे हेमंत विष्णू सावरा होते. या निवडणुकीत भारती कामडी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. कामडी यांना चार लाख मते मिळाली होती. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी देखील त्या इच्छुक होत्या.
आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत फूट पडली तेव्हा भारती कामडी उद्धव ठाकरे यांना साथ दिली होती. त्याचेच फळ म्हणून ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत त्यांनी चांगली लढत दिली. मात्र भाजपच्या हेमंत सावरा यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. निवडणूक अगदी जवळ आलेली असताना पालघरमध्ये घडत असलेल्या या घडामोडी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या आहेत.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर, बारामतीसाठी दादांच्या ‘गेम चेंजर’ घोषणा
Uddhav Thackeray पोहरादेवीच्या महंतांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र
दरम्यान, याआधी पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. निवडणूक अगदी जवळ आलेली असताना सुनील महाराज यांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुनील महाराज ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.