17.3 C
New York

Shahrukh Khan : सलमान खाननंतर शाहरुख खानला धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

Published:

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला (Salman Khan) सातत्याने धमक्या येत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याला पुन्हा धमकी देण्यात आली होती. आता अभिनेता शाहरुख खानला देखील (Shahrukh Khan) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या नंतर वांद्रे पोलिसांनी तातडीने केस दाखल करून घेत तपास सुरू केला. आता अशी माहिती समोर येत आहे की शाहरुख खानला धमकी देणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी हा कॉल ट्रेस केला आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकीचा फोन शाहरुख खानची प्रोडक्शन कंपनी रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये आला होता. यानंतर जोरदार खळबळ उडाली. धमकीची तक्रार पोलिसांत करण्यात आली.

वांद्र पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केल. पोलिसांचं एक पथक थेट छत्तीसगडमधील रायपूर येथे पोहोचलं. पोलिसांनी कॉल ट्रेस केल्यानंतर त्यांना हा फोन रायपूरमधून आल्याची माहिती मिळाली. लास्ट लोकेशन येथील एका बाजारातील मिळाले. पोलिसांच्या पथकाने येथील लोकांची चौकशी सुरू केली. या घटनेची चौकशी सायबर सेलही करत आहे. मोबाइल नंबर बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आहे का याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात सध्या मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेसचा बंडखोरांना दणका! पाच नेते सहा वर्षांसाठी निलंबित

दरम्यान, शाहरुख खानने नुकताच त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा केला होता. परंतु, सुरक्षिततेच्या कारणांमुळे शाहरुखने त्याच्या बंगल्याबाहेरील चाहत्यांशी संवाद साधला नाही. चाहत्यांना घराबाहेर थांबू दिले नाही. कदाचित ही धमकी काही दिवसांपूर्वी देण्यात आली असावी अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार धमकीत ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाही तर जीवे मारू असे आरोपीने म्हटले होते. रिपोर्टनुसार सुरक्षा टीमने हा फोन उचलला होता. फोनवर धमकी देताना आरोपी म्हणाला होता की शाहरुख खान हा बँडस्टँड वाला आहे ना. सुरक्षा टीमने विचारलं की कोण बोलतंय तेव्हा आरोपी म्हणाला की लिहायचं असेल तर माझं नाव हिंदुस्तानी असं लिहा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img