20.7 C
New York

Uddhav Thackeray : महायुतीला घाम फोडणारा ठाकरेंचा वचननामा जाहीर

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांचे वचननामे देखील प्रसिद्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वचननामा मातोश्रीवर प्रसिद्ध केलाय. ठाकरे गटाचा वचननामा (Thackeray Group Manifesto) सादर करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय आहे, ते पाहू या.

Uddhav Thackeray ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय?

वचननामा सादर करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोळीवाड्यांची ओळख आम्ही पुसू देणार नाही. कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम ठेवून आम्ही विकास करणार. कोळी बांधवांना मान्य असेल असा कोळीवाड्यांचा विकास करणार. मुंबईचं पळवलेले वित्तीय केंद्र धारावीत उभं करू. मुलांना मोफत शिक्षण देणार. राज्यासाठी नवं गृहनिर्माण घोऱण जाहीर करणार. कोळीवाड्यांचा क्लस्टर विकासाचा जीआर रद्द करणार. जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्ष स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आम्ही पंचसुत्री जाहीर केली.विस्ताराने जाहिरनामा 10 तारखेला येईल. तेव्हा मी कदाचित मुंबईत नसेल. शिवसेनेची वचनबद्धता असते. सागरी मार्ग, 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता कर माफ केला होता. आज वचननामा प्रसिद्ध करतोय. जाहिरनाम्यापासून वेगळे काही नाही. स्वतंत्र असं काही नाही. कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम ठेवू. धारावीच्या माध्यमातून सर्व मुंबईत
बकालपणा आणला जातोय. मुंबईसह राज्याचे गृहनिर्माण धोरण निर्माण करू. धारावीत नवे वित्त केंद्र उभारू. नोकऱ्यांच्या संधी देवू. मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देवू.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू.

आरक्षणावर शरद पवार काय म्हणाले?

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार. ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार. वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार. बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार, निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.

शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षे स्थिर ठेवणार. महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार. प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र 2447 महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार. प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार. जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img