18.9 C
New York

Latest Updates : ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Published:

जम्मू-कश्मीर विधानसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब

विशेष दर्जाच्या ठरावावर जम्मू-कश्मीर विधानसभेत गदारोळ झाला आहे. त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ

जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ झाला आहे. कलम 370 वर ठरावावरून आमदार खुर्शीद यांच्याशी भाजप आमदारांची हाणामारी झाली आहे.

 दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांकडे सापडली एक लाख 42 हजारांची रोकड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ शहरात गस्त घालत होते. यावेळी विना नंबर प्लेटच्या स्कुटी वरून दोन तरुण निघाले होते. संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबवून त्या दोन युवकांकडे चौकशी करून गाडीची झडती घेतली. यावेळी त्याच्या डिक्की मध्ये एक लाख 42 हजार रुपये रोकड मिळून आली.

मोहोळमध्ये गाडीच्या डिक्कीत सापडले पैसे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ शहरात गस्त घालत होते. यावेळी विना नंबर प्लेटच्या स्कुटी वरून दोन तरुण निघाले होते. संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबवून त्या दोन युवकांकडे चौकशी करून गाडीची झडती घेतली. यावेळी त्याच्या डिक्की मध्ये एक लाख 42 हजार रुपये रोकड मिळून आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर कारवाई करत रक्कम जप्त केली. ही घटना ता 6 नोव्हेंबर रोजी मोहोळ ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर घडली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयात २२ अनुक्रमांकावर सुनावणीसाठी प्रकरण आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून आव्हान देण्यात आले आहे.

राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरु

राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू असून दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी सरकारी यंत्रणांनी माहिती दिली. पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी ही याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img