18.9 C
New York

Jammu-kashmir : जम्मू काश्मीर विधानसभेत गोंधळ, 370 वरून आमदार भिडले

Published:

जम्मू-काश्मीर (Jammu-kashmir) विधानसभेत गुरूवारी मोठा राडा झाला. सरकार आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. याला कारण ठरलं कलम 370. हा राडा एवढा जोरदार झाला की शेवटी सुरक्षारक्षकांना विरोधी पक्षातील आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढलं.

बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी बारामूला येथील लोकसभेचे खासदार इंजिनिअर राशिद यांचे बंधू खुर्शीद अहमद यांनी विधानसभेत कलम 370 च्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली. यानंतर विरोधी पक्षातील भाजपचे आमदार चांगलेच संतापले.

भाजपचे नेते, आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, सुनील शर्मा यांनी बॅनरबाजीला जोरदार विरोध दर्शवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकमेकांसमोर आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

सदाभाऊ खोत यांच्या विधानावरून, राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

तेव्हा, विधानसभेतील वातावरण तापल्यानंतर मार्शलला ( सुरक्षारक्षक ) मध्यस्ती करावी लागली. विधानसभेत राडा करणाऱ्या भाजप आमदारांना सुरक्षारक्षकांनी धक्के मारत बाहेर काढल्याचं व्हिडिओत दिसत आहे. राड्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा काहीवेळासाठी स्थगिती करावी लागली.

Jammu-kashmir कलम 370 चे प्रकरण काय?

केंद्र सरकारनं 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून राज्याचे दोस केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. 11 डिसेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधाशींच्या खंडपीठानं केंद्राचा निर्णय कायम ठेवला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सनं आपल्या जाहीरमान्यात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याच्या दर्जा देण्याचं आणि कलम 370 पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img