5.5 C
New York

Ajit Pawar : पवारांवर टीका होताच, अजितदादांनी सदाभाऊंना फोन करून झाप झाप झापलं…

Published:

आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव् करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून नाराजी वर्तवली आहे. अजितदादांनी फटकारल्यानंतर सदाभाऊ खोत (Sadabhau KhOT) यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं समोर आलंय.

Ajit Pawar सदाभाऊ खोत काय म्हणाले?

शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत सदाभाऊ खोत यांनी दिलगीरी व्यक्त केलीय. दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी खोत यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिलाय. बोललेली भाषा गावगाड्याची भाषा असल्याचं खोत म्हणालेत. “कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा असून काही लोकांनी शब्दांचा विपर्यास केलाय. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त करतो,” असं खोत म्हणालेत.

महायुतीला घाम फोडणारा ठाकरेंचा वचननामा जाहीर

Ajit Pawar अजितदादांचा थेट खोत यांना फोन

अजित पवार म्हणाले की, सदाभाऊ कोत यांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. खोत यांना देखील फोन करून सांगितलं की, तुमचं वक्तव्य आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही हे बंद करा, वैयक्तिक पातळीवर बोलणं चुकीच आहे. अशा शब्दांत अजित पवार यांनी सदाभाऊ खोतांना फटकारलं आहे. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचं उदाहरण घालून दिलंय. आरोप-प्रत्यारोप मांडण्याची एक पद्धत असते, असं अजितदादा म्हणाले आहेत.

यापुढे देखील राज्यात अनेक नेते येतील. त्यांची विचारधाराही वेगळी असू शकते. परंतु मतं मांडत असताना ताळमेळ असला पाहिजे. परंतु झालेला प्रकार हा विनाशकाले विरपित बुद्ध असा आहे. महाराष्ट्र वडीलधारी लोकांबद्दल बोललेलं सहन करत नाही. आम्हाला ते मान्य नाही, असं सदाभाऊ खोत यांना सुनावल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांचा राज्यात मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जातोय. दरम्यान अजित पवार यांनी सुनावल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img