3.5 C
New York

Assembly Election : बच्चू कडूंच्या ‘प्रहार’चा वळसे पाटलांना पाठिंबा

Published:

आंबेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिलीप वळसे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. (Assembly Election) या पाठिंब्यामुळे सहकार मंत्री आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटलांची आंबेगाव तालुक्यात ताकद वाढली आहे. प्रहार पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद देऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाशिवाय मूर्तीकार संघटनांनीदेखील वळसे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जितेंद्र भालेराव यांनी दिली.

Assembly Election वळसे पाटलांकडून मोठा विकास

सहकार मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिपील वळसे पाटील यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याशी चर्चा केल्यानंतर वळसे पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रहार जनशक्तीपक्षाचे तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांनी सांगितले.भालेराव म्हणाले की, वळसे पाटलांनी या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला असून, वळसे पाटील हे विकसनशील नेतृत्व असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय दिव्यांग बांधवांची कामेदेखील वळसे पाटलांनी मोठ्या संख्येने केली आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 420 उमेदवार, मुंबईत हायव्होल्टेज लढत होणार

Assembly Election निकमांकडे सांगण्यासारखे काहीच नाही

वळसे पाटील हे विकसनशील नेतृत्व असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काहीच नाहीये अशी टीकादेखील भालेराव यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, सरपंच जे. डी. टेमगिरे, कालिदास राजगुरू, उमेश पडवळ, शेतकरी संघटनेचे रामभाऊ तोत्रे, सुरेश भालेराव आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img