8.7 C
New York

Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेतून महिन्याला 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांच्या दहा मोठ्या घोषणा

Published:

महायुतीने (Mahayuti) कोल्हापूरमध्ये संयुक्त सभा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचाराचा नारळ फोडला आहे. याच सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी महायुतीचा वचननामा जाहीर करताना दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. आम्ही जे बोलतो करून दाखवतो, असे आव्हानच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहेत.

लाडकी बहिण योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले. ते म्हणाले, लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून विरोधक कोर्टात गेले. आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेलंय. लाडकी बहीण योजना कोणाता माय का लाल आला तरी बंद होणार नाही, तुम्हाला देताना तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर आमचे हात आखडते घेणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. दिल्लीला आम्ही जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. माझा चेहरा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा म्हणून तुम्ही दिल्लीला जाता. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘वचननामा’

1) लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देणार 25 हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करणार

2) शेतकऱ्यांना कर्माफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये, एमएसपीवर 20 टक्के अनुदान

3) प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार

4) वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला 2100 रुपये देणार

5)जीवनाश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार

6)25 लाख रोजगार निर्मिती, दहा लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10 हजार रुपये विद्यावेतन

7) 45 हजार गावांत पाणंद रस्ते बांधणार

8) महिन्याला अंगणवाडी आणि आशासेविकांना पंधरा रुपये वेतन आणि सुरक्षा कवच

9) वीजबिलात 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर वचन

10) व्हिजन महाराष्ट्र@2029 शंभर दिवसांच्या आत सरकार स्थापनेनंतर सादर करणार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img