18.1 C
New York

Ajit Pawar Manifesto : लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर, बारामतीसाठी दादांच्या ‘गेम चेंजर’ घोषणा

Published:

आगामी विधानसभेसाठी अजित पवारांकडून (Ajit Pawar Manifesto) जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. अजितदादांच्या जाहीरनाम्यात (Manifesto) लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. (Ajit Pawar Manifesto For Maharashtra Assembly Election)

Ajit Pawar Manifesto अजितदादांच्या जाहीरनाम्यात काय काय?

बारामतीत कर्करोग उपचार रूग्णालय उभारण्याच येणार

बारामती लॉजिस्टिक पार्क उभारणार

बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची क्रीडा आकदमी सुरू केले जाणार

याशिवाय ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज

बारामतीला पहिलं सौरउर्जा शहर बनवणार

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजार नाही तर, 2100 रुपये देण्यात येणार

महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करणार

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देणार

लाडकी बहिण योजनेतून महिन्याला 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांच्या दहा मोठ्या घोषणा

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या msp वर 20%अनुदान देणार

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा

जाहीरनाम्यात आम्ही सर्व घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न

जाहीरनाम्यात आम्ही सर्व घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत केला असून, महायुतीचाही जाहीरनामा येणार आहे. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष मुंबई येथून मतदारसंघ पुस्तिका सादर करणार आहेत. AI आधारित जाहिरात सुरू केली आहे, त्याला चांगला पाठिंबा मिळतोय. बारामती उमेदवार असल्याने बारामतीचा जाहीरनामा सादर करतोय याचा अभिमान असल्याचेही अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img