12.1 C
New York

Jayant Patil : भांडायला आयुष्य पडलय सत्तेच गणित पाहा; जयंत पाटील बंडखोरांवर चांगलेच भडकले

Published:

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार ताकद लावली तरच आपलं सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता काय कुणाला घाई नाही, असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास काम असतील तरी सांगा असे आमदार कदम म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम असेही जयंत पाटील यांनी म्हटलेय. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा उमेदवार या महाराष्ट्रात निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया असंही ते म्हणाले आहेत.

राजकारण थोडंसं बाजूला ठेवू लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती माणसं परत आवाज काढणार नाहीत, निवांत घरात जाऊन बसतील, असंही ते म्हणाले.

बंडखोर भाजपाच्या रडारवर, तब्बल ४० जणांची पक्षातून हकालपट्टी

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दिल्लीला खुश करण्यासाठी म्हणेल त्या गोष्टी हे करायला लागले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत. मात्र, हे मान वर करुन विचारू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवायला लागली आहेत, असा आरोपही जयंत पाटलांनी केला आहे. 70 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांना मंत्रिमंडळात घेऊन बसलेत असा टोलाही अजित पवारांना लगावला.

ज्या नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता त्या नवाब मलिकांना आणि नवाब मलिकांच्या कन्येला या लोकांनी मित्र पक्षाची तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाच्या पॅनलममध्ये घेतलेले आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा आडवाणींचा आणि अटलबिहारी वाजपेयींचा राहिलेला नाही. महाराष्ट्रातील ही भ्रष्ट राजवट दूर करायची असेल पक्षाची फोडाफोडी थांबायचे असेल तर एकसंधपणाने काम केले पाहिजे, असंही जयंत पाटील यांनी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img