18.1 C
New York

US Elections : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी आघाडी, कमला हॅरिस पिछाडीवर; वाचा, कुणाला किती मते..

Published:

अमेरिकेत (US Elections) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीचे कल हाती येत आहेत. यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार डोनाल्ड ट्रम्प 24 राज्यांत विजयी झाले आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस 13 राज्यांत विजयी झाल्या आहेत.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याचा फैसला सात स्विंग स्टेटमधील निकालावर ठरणार आहे. पेनसिल्व्हानिया तसेच आणखी काही राज्यांत मतदान अजूनही सुरू आहे. या बरोबरच या राज्यांतील प्रारंभिक मतदान आणि पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी केली जात आहे. मतमोजणीच्या हाती आलेल्या ताज्या कलांनुसार रिपब्लीकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 154 तर कमला हॅरिस यांना 81 मते मिळाली आहेत.

270 किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. आता जी आघाडी मिळाली आहे यातून उमेदवार विजयी होण्याच्या जवळ आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. कारण अंतिम निकाल एरिजोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, उत्तर कॅरोलविना, पेन्सिल्वेनिय आणि विस्कॉन्सिन या राज्यांतील निकालांवर अवलंबून असतात.

EVM की बॅलेट..अमेरिकेत मतदान होते तरी कसे? जाणून घ्या

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार कमला हॅरिस पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन या दोन राज्यांत आघाडीवर आहेत. तर जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. कमला हॅरिस यांनी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि कोलोरॅडो येथे विजय मिळवला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा, मोंटाना, मिसुर आणि उटाह येथे विजय मिळवला आहे.

कमला हॅरिस यांनी फर्स्ट काँग्रेसनल डिस्ट्रीक्टमध्ये विजय मिळवला आणि एक मतही मिळवले. कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन येथेही हॅरिस विजयी झाल्या आहेत. अमेरिकेत 50 राज्ये आहेत. यामध्ये बहुतांश राज्ये प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करत आले आहेत. निवडणुकीत महत्वाचे मानले जाणाऱ्या सात स्विंग स्टेटमधील मतदारांचा कल बदलता असतो. लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना निर्वाचक मंडळ मते दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजसाठी मतदान होते. २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img