18.1 C
New York

Latest Updates : ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Published:

शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात शरद पवारांच्या सभा होतील. शरद पवार यांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात सभा घेणार आहेत.

जयंत पाटील यांच्या राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार आहेत. १३ तारखेनंतर शरद पवार पुण्यात सभा घेतील. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ १८ तारखेला विराट सभा होतील. बारामतीत १८ तारखेला शरद पवारांची भव्य सभा होणार.

पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीतील प्रमुख चार पक्षांसह १५ पक्षांची समन्वयाची मोट बांधण्यात आली आहे. माना पमानावरून होणारे रुसवे-फुगवे, गैरसमज टाळून एकत्रितपणे समन्वयाने विधानसभानिहाय प्रचार करण्यावर महायुतीने भर दिला आहे.

अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईत दोन मोठ्या सभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईत दोन मोठ्या सभा होणार आहेत. एकाच दिवशी बोरिवली आणि घाटकोपरमध्ये अमित शाहांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात होणार सभा होणार आहेत. मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी करण्याच येच आहे.

अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

अजित पवारांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांकडे गेलेले मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. नरेंद्र राणे यांच्या सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी विलास माने, दिनकर तावडे आणि विजय देसाई यांचा देखील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. दुपारी १२ वाजता सिल्वर ओक निवासस्थानी पक्ष प्रवेश पार पडणार.

राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पावसाने कायमची माघार घेतल्यानंतर आता राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. पण, अद्याप राज्यात पूर्णपणे थंडी सुरु झालेली नाही. राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी जास्त होत आहे. त्यामुळे दुपारी ऊन्हाचा चटका बसत आहे, तर रात्री थंडी जाणवत आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. कोकणात आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे, तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्री हवेत गारवा जाणवत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img