12.1 C
New York

Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले मी अजून किती दाढी पिकवायची?, निलेश राणेंच्या मनात काय..

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections 2024) आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. यातच आता कुडाळ मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे (Nilesh Rane) यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्यामागून आलेले अनेक मंत्री झाले अशी खंत राणे यांनी बोलून दाखवली. निलेश राणे यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राणे पुढे म्हणाले, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यामागून आलेले अनेक मंत्री झाले जिथे राणे साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचंय यासाठीच मी कुडाळ मालवण मतदारसंघातून उमेदवारी करत आहे. यंदा मला कुडाळ मालवणमधील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. या मतदारसंघात मी कुणाचा पराभव करण्यासाठी म्हणून निवडणुकीत उतरलेलो नाही. तर काहीतरी चांगले करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत आहे. मला याआधी नारायण साहेब आणि रवींद्र चव्हाण यांनी राज्यसभेची ऑफर दिली होती. मात्र मी त्याला स्पष्ट नकार दिला. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की जिथून साहेबांचा पराभव झाला तिथून मला निवडून यायचं आहे. म्हणून मी या मतदारसंघातून उमेदवारी करत आहे.

भांडायला आयुष्य पडलय सत्तेच गणित पाहा; जयंत पाटील बंडखोरांवर चांगलेच भडकले

Nilesh Rane वैभव नाईकांना राणेंचं कडवं आव्हान

राणे विरुद्ध नाईक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक संघर्षातील नवी लढाई यंदा कुडाळ मतदारसंघात होणार आहे. शिवसेनेत प्रवेश करत निलेश राणेंनी तिकीट मिळवलं आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं आव्हान आहे. निलेश राणे यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक विजयी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. या राजकीय घडामोडींत वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी नारायण राणेंनी दावा केली होता. निलेश राणेंनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मात्र कुडाळवरील दावा सोडला नाही. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. यावर मध्यममार्ग काढण्यात आला. मागील आठवड्यात निलेश राणेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. नारायण राणे यांनी सन २००५ मध्ये शिवसेना सोडली होती. त्यानंतर जवळपास वीस वर्षांनंतर राणे कुटुंबातील सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img