5.5 C
New York

Sharad Pawar : पुढची तयारी म्हणून युगेंद्र, काय म्हणाले शरद पवार?

Published:

युगेंद्र पवार यांनी बारामती इथं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांचं शिक्षण बाहेर देशात झालं. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिलं तर ते उच्च शिक्षित आहेत. ते ज्यावेळी पुन्हा बारामती (Sharad Pawar) येथे आले तेव्हा (Baramati ) त्यांच्याकडं कारखाना चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. त्याचदरम्यान, त्यांनी इथलं नेतृत्व करावं अशी त्यांना मागणी केल्यावर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली असं म्हणत त्यांना आपण सुप्रिया सुळेंसारखच मोठ्या मताधिक्याने निवडून द्याव अशी विनंती केली. ते बारामती मतदारसंघातील प्रचार दौऱ्याद बोलत होते.

आजपर्यंत तुम्ही आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. तुम्ही मलाही कायम मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलं. त्यानंतर सुप्रियालाही मोठ्या मताने आपण निवडून दिलं. नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीत कौटुंबीक अडचण झाली. परंतु, तरीही आपण सुप्रियाला लोकसभेत पाठवलं. तोच निर्णय तुम्ही योगेंद्र पवार यांच्याबाबातही घ्याल हा विश्वास आहे असंही पवार यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, मोठा प्रतिसाद योगेंद्र यांना भेटत असल्याने बारामतीची ही काका-पुतण्याची निवडणूनक मोठी चर्चेत आल्याचं सध्याचं चित्र आहे.

प्रत्येक खासगी मालमत्तेवर सरकारचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

तुम्ही मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. त्यानंतर सर्व सत्ता अजित दादांच्या हातात दिली. निर्णय तुम्ही घ्यायचे निवडणूका तुम्ही घ्यायच्या. त्यांनी – २५ – ३० वर्षे त्यांनी ते काम केलं याबाबत माझ्या मनात शंका नाही. आता पुढची तयारी करायची की नाही ? पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व आहे. ते तयार करावं लागेल. संधी सर्वांनी युगेंद्र यांना संधी द्याला हवी असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

सुप्रियाचा देशात संसदेत आज नंबर दुसरा आहे. तुम्हा लोकांच नाव देशात गेलं आहे. तुम्हा लोकांचा नांव लौकिक महाराष्ट्राच्या बाहेर गेला यांचा आनंद आहे. समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास पाहिजे, कारखानदारीचा अभ्यास पाहिजे. आज एक एम आय डि सी काढली. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला. याच कामाला गती द्यायची असेल तर जाणकार आणि कष्ट करणारा प्रतिनिधी निवडला पाहिजे म्हणून आम्ही युगेंद्रची निवड केली आता काम तुमचं आहे असं म्हणत पवारांनी युगेंद्र यांना निवडून द्यावं अशी विनंती उपस्थितांना केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img