12.1 C
New York

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Published:

रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती (Maharashtra New DGP) करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानंतर काल (दि.4) शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने नव्या पोलीस महासंचालक पदासाठी आज (दि.5) दुपारी एक वाजेपर्यंत नावे सुचवण्यास सांगितले होते. त्यानंतर आता या पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार वर्मा हे १९९० च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

काँग्रेस नेते नाना पटोलेंसह विरोधकांकडून रश्मी शुक्ला यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची सातत्याने चर्चा रंगली होती.

नंदूरबारमध्ये भाजपला धक्का! माजी खासदार हिना गावितांचा पक्षाला रामराम

Maharashtra New DGP कोण आहेत राज्याचे नवे पोलीस महासंचालक?

रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी आहेत. सध्या वर्मा डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहे. वर्मा यांचे नाव नवे पोलीस महासंचालक म्हणून कालपासून चर्चेत होते. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img