5.5 C
New York

Sharad Pawar : आता कुठे तरी थांबलं पाहिजे; नातवाच्या ‘स्वाभिमान’ सभेत पवारांचे निवृत्तीचे संकेत

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली त्यानंतर आजपासून उमेदवारांच्या जाहीर प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. त्यांनी या सभेत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यातून शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक प्रकारे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी राज्यभरात दौऱ्यांना सुरुवात केली आहे. आजपासून उमेदवारांच्या जाहीर प्रचाराला सुरुवात झाली आहे. शरद पवार सध्या बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत शरद पवारांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

शरद पवार म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहे. पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागणार आहे. आता मी निवडणूक लढवणार नाही. १४ वेळेस निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा युगेंद्र पवार यांना पाठिंबा आहे. नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

नंदूरबारमध्ये भाजपला धक्का! माजी खासदार हिना गावितांचा पक्षाला रामराम

शरद पवार पुढे म्हणाले, आता मी लोकसभा निवडणूक किंवा कोणतीही निवडणूक लढणार नाही. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या आणखी किती निवडणुका करायच्या. तुम्ही मला एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देता. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, काही लोक म्हणतात की ते तुमच्याकडे येतील तुम्हाला भावनिक करतील. पण भावनिक करण्याची काही गरज नाही. मी माझ्या माणसांना चांगलं ओळखतो. सुप्रिया सुळे यांना 48 हजार मते जास्त दिली. आता विधानसभा निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ या. मला आता आमदारकी नको, खासदारकी नकोय फक्त लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. राज्यात जर आपल्या विचारांचं सरकार आलं तर युगेंद्र भक्कमपणे इथले प्रश्न सोडविल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img