10.6 C
New York

Uddhav Thackeray : ‘मी देखील भाजपसोबत जाऊ शकलो असतो पण…’, उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Published:

आजपासून शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसाठी (MVA) प्रचाराची सुरुवात केली आहे. आज त्यांनी राधानगरी मतदारसंघातून (Radhanagari Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील (K.P. Patil) यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार निशाणा साधला.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या मनात एक जो राग आहे. तो राग गेल्या अडीच वर्ष आपण आपल्या ह्र्दयामध्ये ठेवला होता. कधी एकदा वेळ येते आणि कधी या खोते सरकारला जाळून भस्म करतात याची वाट संपूर्ण महाराष्ट्रात पाहत होता आणि आता तो क्षण आला आहे. अजनूही आपल्याला न्यायपालिकेमधून न्याय मिळालेला नाही. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली मात्र त्या न्यायदेवतेला आपली देशामधील लोकशाही मरत आहे हे अजूनही दिसलेले नाही.

म्हणून मी तुमच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे. मी माझ्यासाठी लढत मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. मी देखील त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. त्यांना 50 खोके दिले. मी जर अक्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडलं असतं पण माझ्या रक्तात गद्दारी नाही. असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला.

‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र अदानीला विकला जातोय, फुकट दिला जातो. आम्ही काय बघत बसणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच जो कोणी मोदी – शाह यांना मदत करणार, जो कोणी भाजपला (BJP) मदत करणार आणि जो कोणी अदानीला मदत करतोय. तो महाराष्ट्राचा शत्रू आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील जोरदार हल्लाबोल केला. ही सरकार टक्केवारीचा सरकार आहे, खोके सरकार आहे. यांना निवडणूक जवळ आली तर बहीण दिसायला लागली. बदलापूरमध्ये एका बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर तुमचे पोलीस त्या पीडितांच्या आईची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत होते. तुम्ही कोणत्या तोंडाने त्या बालिकेच्या आईला लाडली बहीण म्हणून तुम्ही 1500 रुपये देणार आहे. असा प्रश्न देखील या वेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img