-5.9 C
New York

US Elections 2024 : EVM की बॅलेट..अमेरिकेत मतदान होते तरी कसे? जाणून घ्या

Published:

आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान (US Elections 2024) होत आहे. मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवारासाठी मतदान करतील. परंतु येथे मतदानासाठी भारताप्रमाणे ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरचा (Ballot Paper) वापर होईल. असे नाही की अमेरिकेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर होईल. पण बहुतांश लोक बॅलेट पेपरवरच विश्वास ठेवतात. काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे (Donald Trump) सहकारी एलन मस्कने देखील (Elon Musk) मशीनच्या माध्यमातून मतदानाचा विरोध केला होता. मशीनला सहज हॅक करता येऊ शकते पण बॅलेट पेपरच्या बाबतीत असे करता शक्य नाही असे मस्क म्हणाला होता. अमेरिकेसह आणखी काही देशांत आजही बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केले जाते. विश्वासार्हता हेच यामागे सर्वात मोठे कारण आहे. चला तर मग जाणून घेऊ की अमेरिकेत नेमके मतदान कशा पद्धतीने होते.

US Elections 2024 अमेरिकेत कसे होते मतदान

अमेरिका आणि भारतातील निवडणुकीत मोठा फरक आहे. भारतात मतदानाच्या 36 तास आधी प्रचार थांबवावा लागतो. तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदानाच्या तारखेच्या काही आठवडे आधीच मतदान सुरू होते. अमेरिकेत मुख्य तारखेआधी होणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवातीचे मतदान असे म्हटले जाते. यामध्ये मतदार वैयक्तिकपणे आणि मेल इन बॅलेटच्या (Mail in Ballot) माध्यमातून मतदान करतो. अमेरिकेत आतापर्यंत 7.21 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी प्रारंभिक मतदानाच्या माध्यमातून मतदान केले आहे. आता मंगळवारी मतदार राज्यांमधील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार आहेत.

US Elections 2024 ईव्हीएम की बॅलेट, कसे होते मतदान

अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीत (US President Election) बहुतांश मतदान बॅलेट पेपरद्वारे होते. सन 2000 मध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी निवडणूक प्रक्रिया थोडी वेगळी होती. बॅलेट पेपरबरोबरच पंच कार्ड व्होटिंग मशीनद्वारे मतदान केले जात होते. परंतु या निवडणुका चांगल्याच वादग्रस्त ठरल्या होत्या. निवडणूक निकालावर संशय व्यक्त करण्यात आला. रिपब्लिकन उमेदवार जॉर्ज बुश यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अल गोर यांना 537 मतांच्या फरकाने पराभूत केले. या निवडणुका इतक्या वादग्रस्त ठरल्या होत्या की सुप्रीम कोर्टाला फेर मतमोजणी मध्येच थांबवून जॉर्ज बुश यांना विजयी घोषित करावे लागले होते.

यानंतर मतदानात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले. हेल्प अमेरिका व्होट ॲक्ट पास झाल्याबरोबर सरकारने डायरेक्ट रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक मशीन (DRE) खरेदी करण बंद केले. सन 2006 मध्ये पेपरलेस मशीनद्वारे मतदानासाठी नोंदणीकृत मतदारांचा आकडा वाढला होता. त्याच वेळी हाताने मार्क केलेले बॅलेट पेपर जास्त लोकप्रिय होत होते.

यानंतरच्या एक दशकापर्यंत एकूण मतांचा जवळपास एक तृतीयांश हिस्सा इतके मतदान DRE मशीन द्वारे केले जात होते. Brennancenter.org नुसार 2014 पर्यंत 25 टक्के मतदार पेपरलेस मशीनचा वापर करत होते. पण 2016 मध्ये बॅलेट पेपरकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला होता. सन 2024 च्या निवडणुकीत जवळपास 98 टक्के नागरिक बॅलेट पेपरचा वापर करणार आहेत. 2020 मध्ये हा आकडा 93 टक्के इतका होता.

अरिजोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन या सात स्विंग स्टेटमध्ये पेपर ट्रेल व्होटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. मतदानानंतर होणाऱ्या ऑडिटसाठी बॅलेट पेपर उपयुक्त ठरतात. ज्यांचा उपयोग अमेरिकेतील 48 राज्यांत केला जातो. युनिव्हर्सिटी ऑफ लोवामधील रिटायर्ड प्रोफेसर डग्लस जोन्स यांनी सांगितले की मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर याच उद्देशाने केला जातो की गडबडीच्या कोणत्याही स्थितीत पुरावे तपासता येऊ शकतील. मतमोजणीसाठी स्कॅनरचा वापर करून अनेक प्रकारच्या संभाव्य चुका टाळता येऊ शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.

US Elections 2024 मतदार राष्ट्रपती निवडत नाहीत

हेच कारण आहे की अमेरिकेत मतदानाच्या अनेक दिवस मतमोजणी आणि त्यांची जुळवणी सुरू असते. त्यामुळे निकाल येण्यास काही दिवस लागतात. खरं तर अमेरिकेत थेट मतदारांच्या मतदानातून राष्ट्रपती निवडला जात नाही. प्रत्येक राज्यातील निर्धारित ईलेक्टर्स राष्ट्रपतींची निवड करतात. कोणत्या राज्यात कोणत्या उमेदवाराचा विजय झाला आहे हे जनतेच्या मतदानातून ठरवले जाते. उमेदवारांनी जिंकलेल्या राज्यांतील इलेक्टर्सची संख्या मिळून 270 चा आकडा जो पार करतो तोच उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याचे घोषित केले जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img