8.3 C
New York

Eknath Shinde : ‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल

Published:

पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नॉनस्टॉप हल्लबोल चढवलायं. महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेतून मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार ऐकणारं असावं लागत, बोलणारं असावं लागतं पण पूर्वीच सरकार बहिर होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढचं माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये, शेतकऱ्यांच्या बांधावर, लाडक्याा बहिणींची कैफियत ऐकावी लागते फक्त कोमट पाणी प्या एवढं म्हणून चालत नसतं, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केलीयं.

तसेच कोविडमध्ये एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून लोकांमध्ये गेला तसाच शंभूराज देसाईंनीही चांगल काम केलंय. त्याची पोहोचपावती जनता देणारच आहे,. संकटं येतात तेव्हा शंभूराज देसाई पुढे असतात, ते मतदारांना आपलं कुटुंब मानतात, म्हणूनच ते तीनवेळा निवडून आले आहेत. या मतदारसंघात तिरंगी नाही तर एकतर्फी निवडणूक आहे. कोणीही आला तरीही जनता निभाव लागू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलायं.

काँग्रेस पक्षाने संविधानाचा सर्वाधिक अनादर केला, फडणवीसांची टीका

आम्ही उठाव केला तेव्हा देसाई माझ्यापेक्षा दोन पाऊले पुढे होते, त्यामुळे मी त्यांना दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री केला आहे. देसाईंना सातारा आणि ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री केलायं. जेव्हा शंभूराज सर्वात पुढे होते तेव्हा त्यांनी कधी विचारलं नाही कुठे चाललो आहे. त्यांनी छातीचा कोट काढून लढाई केली. शंभूराज यांच्या मागे ज्योतिबा, येडोबा आहे, जनता जनार्दनाचे आशिर्वादही आहेत. त्यामुळे कोणीही येवो पाटणचा गड शंभूराजेच सर करणार असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय.

Eknath Shinde काँग्रेससोबत घरोबा म्हणूनच उठाव केला….

लोकांनी जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकायला काढला तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण होऊ लागलं. धनुष्यबाण, विचार मोडून टाकले तेव्हा आमचेच कार्यकर्ते देसाई म्हणायचे कधी करायचंय तेव्हा आम्ही वेळेवर करेक्ट कार्यक्रम केला, टप्प्यात आला की कार्यक्रम झाला. लोकांच्या मनाविरुद्ध सरकार स्थापन झालं होतं. निवडणुकीनंतर काँग्रेससोबत घरोबा केला ते बाळासाहेबांना मान्य नव्हतं म्हणूनच आम्ही उठाव केला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img