जनतेचा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे, तसेच माझ्या मतदारसंघामध्ये माझा मतदार मला निवडून देईल, असा मला विश्वास आहे. माझ्या लाडक्या बहिणी मला नक्कीच मतदान करणार, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. संविधानाचा सर्वाधिक अनादर जर कोणत्या पक्षाने केला असेल, तर तो फक्त काँग्रेस पक्षाने केला आहे, असे ते म्हणाले आहेत. नागपूर दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघात आज प्रचार रॅली काढण्यात आली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. (Devendra Fadnavis criticizes Congress.)
यावेळी ते म्हणाले की, संविधानाचा सर्वाधिक अनादर जर कोणी केला असेल तर तो फक्त काँग्रेस पक्षाने केला आहे. तसेच उद्या राहुल गांधी नागपूरमध्ये संविधान संमेलन करणार आहेत, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचे आता नाटक आणि नौटंकी सुरू आहे. तसेच ये पब्लिक है सब जानती, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली राज्याची प्रगती जनता पाहत आहे. जनतेचा विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकार नक्कीच विजय होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
“मु्ख्यमंत्रिपदासाठी आमच्यात कोणतीच रस्सीखेच नाही कारण..”, फडणवीसांनी क्लिअरचं केलं
माझ्या लाडक्या बहिणी मला नक्कीच जास्त मतदान करून निवडून देणार आहेत, असा विश्वास त्यांनी बहिणींच्या प्रती व्यक्त केला आहे. अशाप्रकारे नागपूर दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघात आज प्रचार रॅली काढण्यात आली, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या लढती स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक सभेचे आयोजन केले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.