विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी माघार घेण्याची घोषणा केलीय. आज त्यांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय. यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake)पाटलांनी निशाणा साधलाय. त्यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. हाकेंनी काल मनोज जरांगे मॅनेज झाले असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की,गेल्या अनेक दिवसांपासून मी सांगत होतो की, जरांगेसारखा माणूस निवडणूक लढवणार नाही, निवडणुकीला सामोरं जाणार नाही. बारामतीवरून येणाऱ्या स्क्रिप्टवर जरांगे नावाचा माणूस काम करेन, अशी मी नेहमी भूमिका मांडली आहे. निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एकाच जातीवर काम करून भागत नाही. जरांगे पाटील म्हणायचे की 130 आमदारांचा मी सुपडासाफ करणार आहे. कुठे गेली भाषा,असा सवाल हाकेंनी केलाय. जत्रा भरवणं सोपं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जरांगे पाटलांनी पळ काढायला नव्हता पाहिजे, आमने-सामने लढायला पाहिजे होतं असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब
लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे. राणांना लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला. दिवसाला भूमिका बदलणार माणूस आहे. मुंबई वेशीवरून माघारी आलेत. जरांगेंचा राजकारण, निवडणुकीचा अभ्यास नाही. आमचे पण काही उमेदवार आहे. अनेक ठिकाणचे आमचे ओबीसी उमेदवार निवडून येणार आहेत. 10 ते 12 मतदार संघात आमचे उमेदवार आहेत. मराठवाड्यातील 7-8 जिल्ह्यात आम्ही काम करत आहोत. शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठींबा ओबीसींबाबत भूमिका घेणार असेल तरच देणार. विरोधात असेल त्याचा विरोध असेल, असा इशारा देखील हाकेंनी दिलाय.
अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेतली आहे, त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे.जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल. मी पळ काढणारा नाही, तीन वाजेपर्यंत वाट पहा असं हाकेंनी सांगितलं आहे. शरद पवारांकडे नेता म्हणून पाहिले जातं. शरदचंद्रजी पवार यांना ओबीसी हिताचे कुठलेही देणंघेणं नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. शरद पवार यांनी जरंगे पाटील यांना समजावून सांगितले पाहिजे. ओबीसी बाजू घेणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल, असं हाकेंनी जाहीर केलंय.