विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपापल्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एकीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात यश येत असतानाच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi ) नेत्यांकडून फोनाफोनी करून बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली जात आहे. ज्यामुळे आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. मविआतील जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार, असंही यावेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितल आहे.
Sharad Pawar जरांगे पाटलांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे असा विरोधकांचा आरोप आहे असं शरद पवारांना विचालं असता, पवार म्हणाले याच्यामध्ये काही तथ्थ्य नाही. जरांगे पाटील यांचा तो स्वतंत्र निर्णय आहे. अगोदर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता तोही त्यांचाच निर्णय होता. परंतु, त्यांच्या योग्य निर्णय आहे. कारण, त्यांचा सरळ भाजपला विरोध आहे. जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर त्याचा भाजपला फायदा झाला असता. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.
विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील
महाविकास आघाडीतील बंडखोरीबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, सर्व बंडखोरांना सूचना गेल्या आहेत. आम्ही सांगूनही कुणी अर्ज मागे घेतले नाही तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. आमचा पूर्ण प्रयत्न आहे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढत आहोत. काही वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.