3.2 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांचं नाव घेत लक्ष्मण हाके काय म्हणाले?

Published:

विधानसभा निवडणुकीच्या धुमाळीत काही नेत्यांच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष आहे. आज सकाळीच मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. ओबीसीचे जे निवडून येणारे उमेदवार आहेत ते कोणत्याही पक्षाचे असोत आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. आमचे पाठिंबा असलेले उमेदवार – सांगोला, जत, मुखेड, मान, लातूर पूर्वचे आहेत. कोणत्याही पक्षाचा असो. पण निवडून येणारा असावा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उमेदवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असेल पण तो अटीवर असेल, असं हाके म्हणालेत.

Sharad Pawar शरद पवारांचं नाव घेत लक्ष्मण हाके काय म्हणाले?

ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावणार नाही, याला जर शरद पवार यांच्या उमेदवारांचं समर्थन असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तसं असेल तर शरद पवार यांच्या उमेदवारांसाठी सभाही घेऊ. पण नेत्याच्या सांगण्यावरून उमेदवार काळंबेरं करणार असेल तर आम्ही त्याला पाडा म्हणून सांगू, असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब

शरद पवार यांचा प्रचार नाही. शरद पवारांचा एखादा ओबीसी उमेदवार असेल, तो ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कन्व्हिन्स करणार असेल तर आम्ही त्यांची सभा घेऊ. जोपर्यंत अशोक चव्हाण ओबीसी आरक्षणाबद्दल जाहीर भूमिका घेणार नाही तोपर्यंत भोकरमध्ये सभा घेणार. माझ्या ६०-७० सभा महायुतीच्या विरोधात झाल्या आहेत. त्यामुळे मी महायुतीचा आहे, असं म्हणू शकत नाही. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं लक्ष्मण हाके म्हणालेत.

Sharad Pawar ३ वाजेपर्यंत वाट पाहा- हाके

जातीच्या लढायला संपवाव्यात आम्हालाही वाटतं. पण सुरुवात कुणी केली. पैसे कुणी वाटप केले. भूमिका कोणी घेतल्या. मी पळ काढणारा नाही. माझ्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे. ३ वाजेपर्यंत वाट पाहा. आमची भूमिका ओबीसींचे हक्क आणि अधिकाराची आहे. राज्यातील २०० मतदारसंघात ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची २ लाखांपेक्षा संख्या आहे. पण २५ पेक्षा जास्त उमेदवार सत्ताधारी पक्षांनी दिलेले नाहीत, असंही हाके म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img