7.5 C
New York

Dilip Walse Patil : विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील

Published:

आंबेगाव तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांमुळे तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले. ते जारकरवाडी येथे आयोजित गाव भेट दौऱ्यात संवादावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.

Dilip Walse Patil शाश्वत पाण्यामुळे राहणीमान उंचावले

उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शाश्वत पाणी उपलब्ध झाल्याने येथील सर्वसामान्य कुटुंबातील माणसांचे राहणीमान उंचावल्याचे वळसे पाटील म्हणाले. यावेळी प्रस्तावित म्हाळसाकांत प्रकल्प, कलमोडी, पांडवदरा, कळमजाई हे उपसा जलसिंचन प्रकल्प लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाहीदेखील वळसे पाटील यांनी नागरिकांनी दिली.

श्रीगोंदा मतदारसंघात मशाल पेटणार का?

Dilip Walse Patil विकास कामे करताना महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य

आरोग्य, शिक्षण, रस्ते आदींसह विविध कामांना तालुक्यामध्ये विकास कामे करताना प्राधान्याने भर दिला. याशिवाय गृहमंत्री म्हणून काम करत असताना पोलीस शिपाई किंवा कॉन्स्टेबल म्हणून पोलीस खात्यात भरती झालेले पोलीस कर्मचारी सेवानिवृत्तीवेळी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त होईल असा मोठा निर्णयही घेतल्याचे वळसे पाटलांनी सांगितले.

गावभेट दौऱ्यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक निलेश थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन टाव्हरे यांनी तर, आभार नवनाथ जारकड, सत्यवान वैद यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष पाचपुते यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img