10.1 C
New York

Assembly Election : शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात ? नवाब मलिकांनी टाकला मोठा बॉम्ब

Published:

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी गेल्या पाच वर्षांत घडल्या आहेत. दोन सरकारे आली. चार पक्ष त्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडूनझाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी त्यात एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यातच एक मोठा दावा केलाय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे संपर्कात आहे, असा दावा मलिक यांनी केलाय. निवडणुकीनंतर तर काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध झाला. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून मलिक यांनी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. तर सना खान हिला मलिक त्यांची मुलगी अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिक यांनी वेगवेगळे विधान केले आहेत.

निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील हे आताच सांगणे कठीण आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे आता सांगू शकत नाही. आता काही लोक सांगत आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा राज्यात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? माझ्या डोळ्यासमोर हे सर्व घडलेले आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं

Assembly Election अजित पवार यांची खूप मदत

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी अजितदादा की शरद पवार यांच्याबरोबर राहणार ही भूमिका जाहीर केली नव्हती. अजित पवार यांच्याबरोबर का गेले ? यावर मलिक म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये असतो तर मला अणुशक्तीनगरमधून तिकीट मिळाले नसते. मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतली नाही हे खरे आहे. पण अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली. त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. मला तिकीट दिल्यानंतर टीका होईल, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात, असे मलिक म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img