5.5 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण होणार लखपती, मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

Published:

अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) आल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये त्या पार्श्वभूमीवर टीकेच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जोरदार टीका केली. आम्हाला लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लखपती होतांना पाहायचं आहे. तुम्हाला फक्त आता वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल, लाडक्या बहीण योजनेला असं म्हणत विरोधक विरोध करत आहेत. मात्र, या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. एकनाथ शिंदे अनेक यावेळी बोलतांना विषयांवर भाष्य केलं. कुर्ल्यात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार तसेच येत्या 23 नोव्हेंबरला अॅटम बॉम्ब फुटणार, असं भाकीतही एकनाथ शिंदेंनी केलं. महाविकास आघाडीवर यावेळी बोलतांना त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. एवढे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल. गेल्या वेळी मंगेश कुडाळकर 24 हजार मतांनी निवडून आले होते. आता तुम्हाला त्यांना 50 हजार मतांनी विजयी करायचे आहे. मंगेश कुडाळकर यांचा विजय निश्चित आहे. मी त्यांचे आधीच अभिनंदन करतोय. आता काही लवंगी फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. पण, आपला २३ तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार, असा दावाही शिंदेंनी केला.

म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद

ते म्हणाले, आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. आता लाडक्या बहिणींना वर्षाला नाही तर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. विरोधक म्हणतात की लाडकी बहिण योजना बंद होईल, आम्ही महिलांना विकत घेतलं, असं म्हणतात. पण, लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्ये दिले. डिसेंबरचे पैसे आता नोव्हेंबरमध्येच देऊ… या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना लाडकी बहीण जोडा दाखवणार. ते या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले, पण कोर्टाने त्यांनाच चपराक दिली. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. माहेरचा आहेर आपल्याला दर महिन्याचा मिळणार, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Ladki Bahin Yojana आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक

यावेळी बोलतांना त्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी खटाखट म्हणाले होते, त्यांनी व्होट घेतले. मात्र, आता पैसे नाही म्हणतात. हिमाचलमध्ये योजना सुरू करून बंद केली. राजस्थानमध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. आधीच सरकार वसुली सरकार होतं, त्यांनी अडीच वर्षात फक्त वसुली मारली. मात्र, महायुती सरकारने आपल्या अडीच वर्षाच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारं सरकार आहे. आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img