8.3 C
New York

Bypolls Election : मोठी बातमी! केरळ, पंजाब आणि युपीची पोटनिवडणूक पुढे ढकलली

Published:

केरळ, (Kerala) पंजाब आणि यूपीच्या पोट निवडणुकांसर्दभात (Bypolls Election) मोठं अपडेट समोर आलंय. या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार होत्या, त्या आता 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 13 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान (Election News) पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेस आणि भाजपसह अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला निवेदन देऊन यूपीमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Assembly Election) तारखा बदलण्याची मागणी केली होती. भाजपच्या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेमुळे कुंडरकी, मीरापूर, गाझियाबाद आणि प्रयागराजमध्ये तीन ते चार दिवस आधीच लोक जमतात. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने कार्तिक पौर्णिमा लक्षात घेऊन तारखांमध्ये बदल करावा. 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला निवडणुका घ्याव्यात, अशी भाजपची मागणी होती.

उत्तर प्रदेशातील 9 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये कानपूरचे सिसामऊ, प्रयागराजचे फुलपूर, मैनपुरीचे करहाल, मिर्झापूरचे माझवान, आंबेडकर नगरचे कटेहरी, गाझियाबाद सदर, अलिगढची खैर, मुरादाबादची कुंडरकी आणि मुझफ्फरनगरची जागा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायकोर्टात प्रलंबित प्रकरणामुळे निवडणूक आयोगाने मिल्कीपूरमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहेत.

माहीम मतदारसंघात होणार तिरंगी लढत, सरवणकर लढतीवर ठाम

कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच कार्तिक पौर्णिमेचा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. देव दीपावली आणि गुरु नानक जयंती या दिवशी साजरी केली जाते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. या पार्श्वभूमीवर आता केरळ, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी या निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून 23 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img