3.7 C
New York

Chhagan Bhujbal : कट्टर विरोधकाकडून जरांगे पाटलांच्या निर्णयाचं स्वागत; नक्की काय म्हणाले भुजबळ?

Published:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Election ) यांनी आज विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली. त्यांच्या घेषणेने राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कालपर्यंत उमेदवार कुठ देणार याची चर्चा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज अचानक कुठच निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर आता त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जो निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील. कुठलेही दडपण येणार नाही. 60 ते 70 टक्के मराठा समाजाचे उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दलित आणि मुस्लीम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. भुजबळ याबाबत विचारलं असता म्हणाले, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होतं. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणं आणि त्यातून निवडून येणं हेच सर्व पक्ष करत असतात असंही भुजबळ म्हणाले आहेत.

अखेर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरुन उचलबांगडी

Chhagan Bhujbal आंदोलन हा सामाजिक प्रश्न

मनोज जरांगे यांनी माघार जरी घेतली असली तरी आंदोलन सुरूच राहणार असंही म्हटल आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणाले, आरक्षणाचं आंदोलन हा एक सामाजिक प्रश्न आहे. मी समता परिषदेच काम अनेक वर्षांपासून करत आहे. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवत नाही आणि लढू शकत नाही. त्या उमेदवाराने तिथल्या मतदारांचा विश्वास कारण निवडणूक लढण्यासाठी संपादन करावा लागतो. मी कुठल्यातरी सामाजिक संस्थेचा आहे म्हणून मला मतदान करा, असं होत नाही. त्यामुळे जरांगे यांचे काम सुरु राहील, असे त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img