5.5 C
New York

Rashmi Shukla : अखेर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरुन उचलबांगडी

Published:

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी बातमी समोर आलीय. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालंय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं आहे.

निवडणूक आयोगाने या तक्रारीची तात्काळ दखल घेतली. राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ आयपीएस केडरमधील अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत तीन आयपीएस ऑफिसर ची समिती नियुक्त करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.

जरांगे पाटलांची विधानसभा निवडणुकीतून माघार; लक्ष्मण हाकेंची तुफान फटकेबाजी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलीय. INC आणि इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करून भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला, DGP महाराष्ट्र यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना निर्देश देऊन त्यांचा पदभार पुढील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला. मुख्य सचिवांना डीजीपी महाराष्ट्र म्हणून नियुक्तीसाठी उद्या दुपारपर्यंत तीन IPS अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

सीईसी राजीव कुमार यांनी यापूर्वी आढावा बैठका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेदरम्यान अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष आणि निष्पक्ष नसून त्यांची कर्तव्ये पार पाडताना त्यांच्या वर्तनात पक्षपाती नसल्याचा इशारा दिला होता. अजूनही आमचे फोन टॅप होत आहे, अशी तक्रार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. भारतीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img