5.7 C
New York

Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मधुरिमाराजे यांची माघार

Published:

राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतलीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलाय.यावेळी स्वत: मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati), खासदार शाहू महाराज छत्रपती, कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

मधुरिमाराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट आलाय. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे नाईलाजाने मधुरिमाराजे यांना माघार घ्यावी लागलं, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिलीय. राजेश लाटकर एक चांगले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्ही माघार घ्यायची ठरवलं, असं शाहू महाराज म्हणाले आहेत.

निवडणुकीतून माघार घेताच प्रसाद लाड यांचा जरांगेंवर हल्लाबोल

या राजकीय घडामोडींमुळे कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती कार्यकर्त्यांवर भडकले होते. सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सकाळच्या हवाल्यानुसार मिळतेय. तुम्ही जे केलंय, ते योग्य नाही. माघार घ्यायची होती, तर अगोदर का नाही सांगितलं? मला तोंडघशी का पाडलं ? माझी नाचक्की का केली ? असे सवाल सतेज पाटील यांनी मालोजीराजे आणि खासदार शाहू महाराज यांना केल्याची माहिती मिळतेय. याप्रकारामुळे मालोजीराजे चांगलेच संतापले आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकरांनी माघार घ्यावी म्हणून सतेज पाटलांसह कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. रविवारी त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न केला होता. परंतु राजेश लाटकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता सतेज पाटलांच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसकडे अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला कोल्हापूर उत्तरमध्ये आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध झाला होता. त्यामुळे लाटकरांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मधुरीमाराजे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img