10.6 C
New York

Prasad Lad : निवडणुकीतून माघार घेताच प्रसाद लाड यांचा जरांगेंवर हल्लाबोल

Published:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून (Vidhansabha Election) माघार घेतली. ते राज्यातील विविध मतदारसंघातून उमेदवार (Candidate) उभे करणार होते. ठरलेल्या मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारांनी अर्जही भरले होते. मात्र, आता निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली. त्यांच्या या निर्णयावर भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सडकून टीका केली.

मनोज जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेऊन आजच निर्णय जाहीर केल्याचा दावा लाड यांनी केला. २८८ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी जरागेंनी केली होती. कालपासून ते १३-१४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. मुस्लिम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणारी नाही, असं म्हणत जरागेंनी माघार घेतली. त्यांच्या या भूमिकेवर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेऊन आजचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय शरद पवार आणि महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतल्याचा आरोप लाड यांनी केला.

मोठी बातमी! केरळ, पंजाब आणि युपीची पोटनिवडणूक पुढे ढकलली

Prasad Lad जरांगेंनी राजकारण्यापेक्षाही वाईट राजकारण केलं…

पुढं बोलतांना लाड म्हणाले की, मनोज जरांगेंची नौटंकी ही आजची नाही. तर गेल्या सात-आठ महिन्यांपासूनची आहे. मराठा समाज त्यांची नौटंकी पाहत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाशी धोका करून समाजाला खोटं पाडण्याचं काम केलं. मनोज जरंगे हे मीडियासमोर डोळ्यात पाणी आणून मगरमच्छ के आसू दाखवून मराठा समाजाचे नुकसान करत आहेत. राजकारण्यापेक्षाही वाईट राजकारण करण्याचे काम जरांगे करत असल्याचा घणाघातही लाड यांनी केला.

Prasad Lad मनोज जरांगेंचा नेमका निर्णय काय?

मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मिक्ष पक्षांची यादी आली नस्याने आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याचे मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीतून निवडून येऊ शकत नाही, राजकारण हा काही आमचं खानदानी धंदा नाही. आम्ही माघार घेणाऱ्यातले नाही. मात्र, एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही, असं जरांगे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img