दिवाळीतील एक महत्त्वाचा आणि एका अतुट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावातील बंधन हे अधिक फुलून येत. सर्वसामान्य असो किंवा राजकारणी हा दिवस आपल्या बहिण भावासोबत उत्साहात साजरा करतात. पण राजकारणात एक असे बहिण भाऊ आहेत ज्यांच्या एकत्र येण्याची अवघा महाराष्ट्र वाट पाहत आहे. (Ajit pawar-Supriya sule) गेल्या काही महिन्यांपासून दुरावलेले हे भावंड यंदाच्या भाऊबीजला एकत्र येणार का ? याकडे सर्वंचं जण लक्ष देऊन आहेत.
बारामती असं म्हटलं की, पवार कुटुंब आठवतं. “बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती” हे असं समीकरण तयार झालयं..पण गेल्या काही महिन्यांपासून या समीकरणात अनेक बदल होताना दिसत आहेत. १९९९ साली सुरू झालेल्या पक्ष स्थापनेपासून ते वयाच्या ८२ व्या वर्षांपर्यंत शरद पवारांसोबत असलेले अजित पवार यांनी ४ जून ला काकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा पासून ‘ पवार विरुद्ध पवार ‘ असं नवं पर्व संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत. राजकीय क्षेत्रात किती ही मतभेद असेल तरी वैयक्तिक आयुष्यात एक कुटुंब म्हणूनच असतो. अगदी लहानपणापासून सोबत असलेले दोन भावंडं राजकीय विश्वामुळे दुरावलेले दिसत आहेत.सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच कुटुंबात वाढलेले आणि शरद पवारांच्या छत्रछायेत मोठे झालेले भावंडं संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. सोशल मिडियावर पहाटेच्या शपथविधीचा फोटो व्हायरल झाला आणि तेव्हापासून पवार कुटुंबात ताटातूट होणार असल्याची चर्चा सुरु झाल्या. काहीही अलबेल नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं जरी असलं तरी ४ जुन २०२३च्या पहाटे राजकीय भुकंप झाला आणि अजित दादांच्या शपथविधीमुळे सारं काही अलबेल नाही हे दिसून आलं.
पालघरमध्ये मोठा ट्विस्ट, अपक्ष उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल; कारण काय?
Ajit pawar-Supriya sule “सख्ख्या भावंडांसारखा जिव्हाळा लावलेलं हे नातं”
त्या दिवसानंतर आता पर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राजकारणातील मतभेदानंतर पारंपारिक सणाला दोघेही एकत्र येतील असं अनेक वेळा वाटलं,मात्र एकत्र आल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि माध्यमांमध्ये चर्चा रंगतील या हेतूने कदाचित त्यांनी भेट टाळली असावी. गेल्या वर्षी रक्षाबंधनाला पवार कुटुंब हे एकत्र दिसतील अशी शक्यता होती मात्र, त्याही वर्षी भेट झाली नाही. १९६७ सालापासून पवार घराण्यात शाही पद्धतीने दिवाळी सण हा सहकुटुंब सहपरिवार साजरा केला जात आहे. या दिवशी संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र येत. पण गेल्या काही महिन्यांपासून बदलत्या राजकीय स्थितीमुळे हे कुटुंब कधीही एकत्र दिसले नाही. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे चुलत बहिण-भाऊ. पण सख्ख्या भावंडांसारखा जिव्हाळा लावलेलं हे नातं. रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज या दोन्ही सणाला अगदी सुरुवातीपासून सोबत असणारे सुप्रिया ताई आणि अजित दादा गेले दोन वर्ष एकत्र दिसले नाहीत. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर अजित पवारांनी अनेक वेळा आपली चूक झाल्याचं देखील मान्य केलं. राजकीय मतभेद असले तरी “साहेब आमचं दैवत”हे वाक्य वारंवार त्यांच्यांकडून ऐकू आलं.
सुप्रिया ताईंबद्दल असलेला आदर आणि प्रेम हे दिसून येतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील, “अजित पवार वेगळे झाले त्याची वेदना आहेच. कारण मी नात्यांना खूप महत्त्व देते. नाती फक्त रक्ताची नाही तर प्रेम आणि विश्वासाची असतात. सत्ता आणि पैसा येतात आणि जातात पण नाती महत्त्वाची असतात तीच टिकतात.”असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात. अनेक वर्षांपासून पवार कुटुंबात साजरा होणारे सण आणि त्यांची दिवाळी ही बारामतीकर अगदी आपल्या कुटु्ंबाप्रमाणे साजरा करतात. बारामतीकरांची गर्दी ही पवारांच्यादारी दिसून येते पण पवार कुटुंबात पडलेल्या फूटीनंतर बारामतीकरांमध्ये देखील संभ्रम दिसतोच. भाऊबीज किंवा रक्षाबंधन या दिवशी अजित पवार आणि सुप्रिया ताई हे एकत्र येतील असं वाटत असताना राज्यात होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण चित्र हे बदलून जातं.भाऊबीजकडे सर्वंच जण हे आतुरले आहेत.मात्र, राज्याच्या राजकारणात किती ही उलाथापलथ झाल्या किंवा राजकारणामुळे “पवार”या कुटुंबात कितीही मतभेद असले तरी राजकीय पोळी बाजूला ठेवून अजित दादा आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला येणार का? आणि या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र येतील का ? हे पाहणं औत्सुक्याचं असेल.