बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नाही की टीबी (क्षयरोग) अत्यंत घातक संसर्गजन्य असा आजार आहे. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज फैलावू शकतो. भारतात या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या (World Health Organization) अहवालानुसार भारतासह जगातील पाच देशांत टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. टीबी कोरोना पेक्षा जास्त घातक आजार आहे.
भारतात टीबीचे 26 टक्के रुग्ण आहेत. इंडोनेशिया 10 टक्के, चीन 6.8 टक्के, फिलिपिन्स 6.8 टक्के आणि पाकिस्तानात 6.3 टक्के क्षयरोगाचे रुग्ण आहेत. ग्लोबल ट्यूबरकॉलॉसिस रिपोर्ट 2024 नुसार या आजाराचे जगभरात 56 टक्के रुग्ण आहेत. जगभरात हा आजार 55 टक्के पुरुषांत, 33 टक्के महिलांत तर 12 टक्के लहान मुलांमध्ये आढळून येतो. सन 2025 पर्यंत भारतातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण सध्याच्या परिस्थितीत भारतातच या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार 2023 मध्ये जगभरातील 8.2 मिलियन रुग्णांमध्ये क्षयरोग आढळून आला होता. या आजाराने होणाऱ्या मृत्युंत मात्र घट झाल्याचे दिसून आले. 2022 मध्ये या आजाराने 1.32 मिलियन मृत्यू झाले होते. 2023 मध्ये यात घट होऊन हा आकडा 1.25 मिलियनवर पोहोचला होता. टीबी मुळे आजारी रुग्णांच्या संख्येत मात्र थोडी वाढ झाल्याचे दिसून आले.
टीबी हा अत्यंत घातक असा संसर्गजन्य आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने मृत्युमुखी पडतात. याच कारणामुळे या आजाराला कोरोना पेक्षा जास्त घातक मानले जात आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. परंतु यात उशीर झाला तर रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. म्हणून जर सारखा खोकला येत असेल तर तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.
World Health Organization का होतो आजार
टीबीचा आजार मायक्रो बॅक्टेरियम ट्यूबरकोलॉसिस नावाच्या विषाणू पासून होतो. जर एखादा व्यक्ती या विषाणूच्या संपर्कात आला तर हा विषाणू श्र्वासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. यानंतर हा विषाणू फुफ्फुसात जाऊन बसतो. विशेततः हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने फैलावतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकला आणि शिंकेमुळे हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो.
World Health Organization काय आहेत टीबीची लक्षणे
खोकला येणे, खोकल्याबरोबर रक्त येणे, छातीत वेदना होणे, श्वास घेण्यास आणि खाकरण्यास त्रास होणे, ताप, थंडी वाजून येणे, रात्रीच्या वेळेस घाम येणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. क्षयरोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे या आजारात सारखा खोकला येत राहतो. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ हा खोकला येत राहिला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.