3.2 C
New York

Ajit Pawar : म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद

Published:

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील सावळ येथे गावभेट दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब यांना या वयात धक्का बसेल, म्हणुन तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केलं. साहेबांचा विचार करून त्यांना निवडून दिलं. मला आता मतदान करा आणि खुश करा. मी खुश म्हणजे साहेब खुश. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही मला मतदान करा, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी बारामतीमधील (Baramati) विकासकामांवर भाष्य केलंय. ते म्हणाले की, बारामतीमध्ये हजारो कोटी रूपयांचे कामं चालू आहे. बारामतीत आरोग्याबाबत अनेक सुविधा निर्माण केल्यात. राज्यात 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिलेत. बारामतीमध्ये 1 लाख 21 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचालाभ मिळतोय. ही योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीच सरकार आणावं लागेलय. गरीब वर्गाची परिस्थिती चांगली करण्यासाठी देखील योजना सुरू केलीय. पुढे वीज सौरऊर्जा पद्धतीने दिली जाणार असल्याचा शब्द अजित पवार यांनी दिलाय.

भाजप पदाधिका,भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचा इशारा

Ajit Pawar अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, सर्व योजना सुरू ठेवण्यासाठी घड्याळाचे बटण दाबा. शरद पवार यांच्यानंतर काम करणं अवघड होत. पण मी विकासकामात आणखी भर घातली आहे. शेतीसाठी आता वीज रात्री नाही, तर दिवसा देणार आहे. जास्तीत जास्त सौरऊर्जा प्रकल्प राबण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री निवांत झोपायचं. यासाठी प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजितदादा म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणतं बटण दाबलं? हे तुम्हाला माहित आहे. शरद पवार यांना त्रास होवू नये, म्हणून सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आज तुम्ही मला मतदान करा. शरद पवार 1967 ते 1990 मध्ये आमदार राहिले. मी त्यानंतर आमदार झालोय. आतापर्यंत खूप विकास केलाय अजून विकास करायचा आहे, असं अजित पवार बारामतीतील गावदौऱ्यात म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img