5.5 C
New York

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात बूस्ट; पठारेंनी पक्षात आणली तरुणांची फळी

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग वाढलं आहे. नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तुतारी हाती घेत आहेत. आताही पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. बापूसाहेब पठारे यांनी पुष्पगुच्छ देऊन या तरुणांचे पक्षात स्वागत केले. शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या कार्यकर्तृत्वाने तसेच बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाने व कामाने प्रेरित होऊन प्रवेश घेतल्याचे या तरुणांनी सांगितले. खराडी येथे हा पक्ष प्रवेश पार पडला.

ऋतिक साठे, विशाल साठे, अक्षय खांदवे, शशांक खांदवे, समीर कोल्हापुरे, अक्षय साठे, ओम साठे, माऊली साठे, पांडुरंग साठे, उमेश साठे, चेतन साठे, ओम पवार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला.

जरांगे पाटलांचं ठरलं! ‘या’ मतदारसंघात उमेदवार उभे करणार

तरुण वर्गाच्या प्रवेशाने मतदारसंघातील पक्षाची ताकद वाढली आहे. “पूर्वी आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा कारकीर्द नव्हती. आमच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव पडला आहे. याचे कारण म्हणजे तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पक्षाकडे ठोस उपाययोजना आहेत. ज्याचा सध्याच्या सरकारमध्ये प्रचंड प्रमाणात अभाव दिसून येतो”, असे यावेळी तरुणांनी सांगितले.

बापूसाहेब पठारे म्हणाले, “तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पक्षात येतोय. येणाऱ्या काळात लोहगाव, खराडी, चंदननगर, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी व एकूणच वडगावशेरी मतदारसंघातील तरुणाईच्या रोजगार निर्मितीसाठी प्राधान्याने काम करायचे आहे. तसेच, रखडलेली विकासकामे जलद गतीने करण्यास मी तत्पर असेल.” यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साठे, हनुमंत साठे, निलेश पवार, सचिन आबा खांदवे, मच्छिंद्र शिंदे व आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img