4.4 C
New York

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी थोपटले दंड, जरांगे पाटलांवर म्हणाले…

Published:

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Assembly Election) मोठी बंडखोरी पाहायला मिळतेय. जागावाटपाचं घोडं अजून काही ठिकाणी अडलेलं आहे. निवडणुकीचा ताळमेळ देखील बसलेला नाही. अशामध्येच दोन्ही गटांसमोर आताम्यान आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आंदोलकांची घोषणा करणार आहेत. लोकसभेमध्ये मराठा फॅक्टर दिसल्यानंतर आता जरांगे यांनी मुस्लिम आणि दलित मतांची मो बंडखोरांना शांत करण्याचं आवाहन आहे. भाजप मनसेला पाठिंबा देताना दिसत आहे, यावरून अजित पवार गट आणि शिंदे गटात नाराजीनाट्य सुरू आहे. दरळी बांधायला सुरूवात केलीय. याचा फटका कोणाला बसतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान शिंदे गटाचे शिलेदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय.

मनोज जरांगे पाटील आज विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची अथवा कुणाला पाठिंबा देणार याची घोषणा करणार आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. आता पैलवान उतरलाय. त्यामुळे समोर कोणीही पैलवान आला तरी कुस्ती खेळायची आहे.जनता आता आशीर्वाद देईल. जनता ज्या पैलवानाच्या डोक्यावर हात ठेवीन तोच पैलवान जिंकेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

मविआत मैत्रीपूर्ण लढती? राऊतांचं वक्तव्य महायुतीचं टेन्शन वाढवणार..

गुलाबराव पाटील यांचं कनेक्ट टू वोटर्स हे मिशन सुरू झाल्याचं दिसतंय. जनतेचा आशीर्वाद पाहिजे असेल तर त्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे, असं मानणारा मी कार्यकर्ता आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. आतापर्यंत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील 42 गावं झालेली आहे. 100च्या जवळपास गावं बाकी आहे. रोज मी दहा ते पंधरा गावं फिरतोय. प्रचार 13 ते 14 तारखेला संपून जाहीर सभांचा कार्यक्रम सुरू होईल. जनतेचा प्रतिसाद मोठा दिसतोय, तसंच या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा देखील मोठा प्रभाव पाहायला मिळतोय. कार्यकर्ते दिवाळी सोडून माझ्यासाठी फिरत आहेत, त्यांचे उपकार कसे फेडावे, हे समजत नसल्याचं देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशी देखील प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे एकमेकांवर जळजळीत टीका करत आहेत. त्यांच्यात वाकयुद्ध रंगलं असल्याचं दिसतंय. यावर गुलाबराव पाटील यांनी एक महत्वाचा सल्ला दिलाय. दोघांनी एकमेकांवर टीका करू नये, ही विनंती असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या बाबतीमध्ये मोठ्या गोष्टी करू नये, असं गुलाबराव पाटील म्हणाले. माहिम मतदारसंघ हा विषय मुख्यमंत्री शिंदे यांचा आहे. ते बरोबर माहिममधील विषय आटोक्यात काढतील, असं पाटील म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img