4.4 C
New York

Manoj Jarange : उमेदवारी दाखल केलेल्यांना अंतरवालीत बोलावलं; मनोज जरांगे पाटील आज घोषणा करणार

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर होऊन उद्या सर्वत्र चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, उद्या अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस आहे. हे सगळ सुरू असताना राज्यभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार? काही दिवसांपूर्वी त्यांनी लढायची घोषणा केलेली आहे. (Manoj Jarange) त्यानंतर अनेकांना उमेदवारी अर्जही दाखल करायला लावले आहेत. मात्र, ते नक्की लढणार की दुसरा काही निर्णय घेणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. उद्या उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत असल्याने आजच जरांगे पाटील लढायचं की पाडायचं याबद्दल निर्णय जाहीर करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवार रात्री अंतरवलीत दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत बैठक झाली. परंतु, त्यामध्ये अनेकजण लढण्यासाठी इच्छूक असल्याने अंतिम तोडगा निघाला नाही. तसंच, जरांगे पाटील यांनी आज ज्यांनी उमेदवार अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांना अंतरवाली सराटीमध्ये बोलावलं आहे. आज दुपारी उपस्थित उमेदवारांशी चर्चा करून जरांगे पाटील हे निर्णय घेणार आहेत. लढायचं की पाडायचं याबाबतचा जो काही निर्णय होईल त्याची घोषणा जरांगे पाटील आजच करणार असल्याचीही माहिती आहे.

विधानसभा उमेदवारांची नावे घोषित होण्याआधीच त्यांना भेटायला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमत आहे. त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, आणि ते निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार होतील याबाबत लोकांमध्ये मोठी उत्कंठा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले अनेक समर्थक त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी विचारपूस करत आहेत. पाटील यांच्यासोबत संवाद साधणार्‍या लोकांमध्ये स्थानिक निवडणुका कशा जिंकता येतील, कोणते मुद्दे चर्चेत आणले पाहिजेत आणि जनसमर्थन कसे मिळवता येईल याबाबत विचारमंथन करत आहेत.

पालघरमध्ये मोठा ट्विस्ट, अपक्ष उमेदवार अमित घोडा नॉट रिचेबल; कारण काय?

Manoj Jarange आज महत्त्वाची बैठक

ज्या मतदारसंघात ज्याला वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशा लोकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण ठरवू की उमेदवार कोण असेल ते…. ज्याला मी सांगेन त्याने अर्ज मागे घ्यायचा. पण जर मी सांगूनही एखाद्याने अर्ज मागे घेतला नाही तर तो आपला नाही. त्याला मदत करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कुणी अर्ज मागे घ्यायचा. हे मनोज जरांगे आज ठरवणार आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याबाबत ते घोषणा घोषणा करणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img