विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी अर्ज दाखल (Maharashtra Elections) झाले आहेत. आता माघार घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. नाराजी उफाळून आली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून काही जणांनी तिकीट मिळवलं आहे. तर काही जणांनी (Nanded News) थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. या बंडखोरांची मनधरणी करण्याची मोहिम सध्या सुरू आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे. पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
माजी आमदार अमित घोडा भाजपकडून इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. महायुतीच्या जागावाटपात ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली होती. त्यांनी येथून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली. विशेष म्हणजे राजेंद्र गावित देखील भाजपमध्येच होते. त्यामुळे या मतदारसंघात चिन्ह जरी शिवसेनेचं असलं तरी उमेदवार मात्र भाजपचाच आहे.
शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, “त्यांच्या काळात …”
अमित घोडा यांना मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. या निवडणुकीत डहाणू किंवा पालघरमधून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमित घोडांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. बंडखोरी झाल्याने महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. अमित घोडा यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आता घोडा अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याचाच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे भाजपाजी मनधरणी यशस्वी ठरणार का, अमित घोडा अर्ज मागे घेणार का, या प्रश्नांची उत्तरे उद्याच मिळणार आहेत.