8.3 C
New York

Eknath Shinde : डिसेंबरचे पैसे कधी मिळणार?; पाडव्याच्या मुहुर्तावर शिंदेंनी दिली लाडक्या बहिणींना ‘गुड न्यूज’

Published:

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा सन्माननिधी देण्यात आला. जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पाडव्याच्या मुहुर्तावर डिसेंबर महिन्याच्या पैशांबाबत अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Eknath Shinde लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा

एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने लाडकी बहीण योजनेचे (Ladaki Bahin Yojana) पैसे वाटप तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. मात्र, त्याआधी ही योजान जाहीर झाल्यापासून लाडक्या बहिणींना महायुती सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. मात्र, ही योजना निवडणुकांनंतर बंद होईल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे ही योजना खरचं बंद होणार का? असा प्रश्न महिलावर्गातून उपस्थित केला जात आहे. मात्र, या सर्व चर्चांमध्येच आता खुद्द एकनाथ शिंदेंनीच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच बँ खात्यात जमा होईल याबाबत महिलांना आश्वासित केलं आहे.

बंडोबांचं अर्धशतक! भाजपला सर्वाधिक टेन्शन; काँग्रेसही हैराण

Eknath Shinde काय म्हणाले शिंदे?

“लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. आम्ही घेणाऱ्यांमधील नव्हे तर, देणाऱ्यांधील असल्याचा टोलादेखील शिंदेंनी विरोधकांना लगावला. आतापर्यंत 2 लाख 20 हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img