-2.1 C
New York

Deepika Padukone Ranveer Singh  : दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने ठेवलं लाडक्या लेकीचं नाव

Published:

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी (Ranveer Singh) दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या लेकीची पहिली झलक दाखवली आहे. (Deepika Padukone Ranveer Singh) यासोबतच त्यांनी मुलीचं नाव देखील चाहत्यांना सांगितलं आहे. दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केलीय. हा फोटो सोशल मीडियावर वेगात व्हायरल होतोय. यामध्ये एका लहान बाळाचे पाय दिसत आहे. सोबतच त्यांनी खाली कॅप्शनमध्ये लेकीचं नाव आणि नावाचा अर्थ देखील सांगितला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाच्या 5 वर्षानंतर 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. दिपावलीच्या शुभ पर्वात त्यांनी मुलीचं नावही सर्वांना सांगितला आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर (Bollywood News) केलाय. “दुआ पदुकोण सिंग. दुआ दीपिका सिंग. ‘दुआ’चा अर्थ प्रार्थना आहे. कारण ते आपल्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे अंतःकरण प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.

आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत : संजय राऊत

या फोटोमध्ये दीपिका पदुकोण दुआला मांडीवर घेवून बसलेली दिसत आहे. मात्र, त्यांचे चेहरे दिसत नाहीत. पण छोट्या दुआचे छोटे पाय दिसत आहे. या पोस्टच्या खाली एका चाहत्याने, “नाव खूप प्रेमळ आहे”, अशी कमेंट केलीय. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आई झाली. तिने 8 सप्टेंबर 2024 रोजी एका छोट्या चिमुकलीला जन्म दिला होता. दीपिकाच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते, आता ती प्रतिक्षा संपलेली आहे. चाहते त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी जामनगरला जाण्यापूर्वी या जोडप्याने गरोदरपणाची घोषणा केली. दीपिकाचा सिंघम अगेन हा चित्रपट नुकताच पडद्यावर प्रदर्शित झालय. मुलीच्या जन्मानंतर रिलीज झालेला दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील दीपिकाचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, करीना कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img