विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे . निवडणुकीसाठी राज्यामध्ये पैशांचा महापूर आल्याचं चित्र निवडणूक आयोगाने केलेल्या कारवायांमधून समोर (Assembly Election 2024) आलंय. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली. प्रशासन देखील तेव्हापासून अलर्ट मोडवर आहे. राज्यात कठोरपणे नाकाबंदी आणि तपासणी करून बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये शेकडो कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले होते. यावरुनच शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला.
पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना पैसे पुरवली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय. बारामतीत दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माध्यमांशी शरद पवार यांनी महायुतीच्या उमेदवारांना पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते, असा गौप्यस्फोट केलाय. परंतु अधिकाऱ्यांचं भवितव्य संकटात जावू नये म्हणून अधिक बोलत नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. आता शरद पवार यांनी केलेल्या दाव्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिलीय.
पवार कुटुंबातील पाडव्यात फूट? शरद पवार म्हणाले, “तर मला..”
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला लोक असं सांगतात की त्यांच्या (शरद पवार) काळात असं चालायचं. आता त्यांना तो (शरद पवार) भास होत असेल. आमच्या काळात तरी असं काही होत नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, बंडखोरांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात आलो होतो. मला अपेक्षा आहे की, सर्वजण आपले अर्ज मागे घेतील गोपाळ शेट्टी यांनी पक्षाचा विचार करावा. मला विश्वास आहे ते पक्षाच्या बाजूने निर्णय घेतील, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले होते की, या सरकारचं वैशिष्ट्य आहे. सरकारने विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे. असं माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.