डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील (Diwali 2024)बच्चेकंपनीने टिळकनगर, पेंडसेनगर, फडके पथ, रामनगर, पश्चिमेला कोपर, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा या सर्व भागात मातीचे एक गडकिल्ले बांधले आहेत.या लहान मुलांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यांनी शहरातल्या बहुतांशी भागात जाऊन लहान मुलांनी केलेल्या किल्ल्यांना भेटी दिल्या. कल्पकता असून लहान मुलांना भरपूर नवनवीन करण्याची इतिहासाचा अभ्यास करून कलाकृती साकार करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते हे दिसून येते.
दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे शिवराय हीच परंपरा जपून मुलांनी विविध किल्ले साकारले आहेत. आपल्या मध्ये जपल्या जाणाऱ्या संस्कृती आणि परंपरांपैकी एक म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याची परंपरा. दिवाळी पहाटचे औचित्य साधून डोंबिवलीत फेरफटका मारताना नाग गणेश मंदिराला भेट देत गणरायाचे दर्शन घेतले आणि सर्वांच्या सुख-समृध्दीसाठी प्रार्थना केली.तसेच या परिसरात मुलांनी दिवाळी निमित्त तयार केलेले किल्ले पाहिले. डोंबिवलीकरांची नवीन पिढी आपला इतिहास जपत आहे. हे सुंदर किल्ले पाहून मुलांचे कौतुक वाटले. वंदनीय शिवछत्रपतींमुळे आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती शाबूत आहे.शिवरायांमुळेच आपण आज आपले सण- संस्कृती साजरी करू शकतो. शिवरायांचा हा गौरवशाली वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे, यातच खरं समाधान असल्याचे चव्हाण म्हणाले.
डीजेच्या गाण्यावर डोंबिवलीकर तरुणाईने साजरी केली दिवाळी पहाट
Diwali 2024 शिवाजी महाराज आणि राजगड किल्ला” थीमवर भव्य रांगोळी
डोंबिवलीतील ट्रेकक्षितिज संस्था दर वर्षी गणपती मंदिर आवरात किल्ले प्रतिकृती बनवते. यावर्षी संस्था नाविन्यपूर्ण विशेष भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. १०x१५ फूट एवढ्या मोठ्या आकाराची ही रांगोळी प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. यंदाची रांगोळी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पराक्रमी राजगड किल्ला या विषयावर आधारित आहे. महाराजांच्या इतिहासाच्या गौरवशाली क्षणांना आणि त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी ही रांगोळी उल्हासनगर चे वाणी सर यांनी साकारली आहे.सर्व कला प्रेमी, इतिहासप्रेमी आणि डोंबिवली शहरातील नागरिकांना या अद्वितीय रांगोळीचे दर्शन घ्यायला आवर्जून आमंत्रित करण्यात येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने या देखण्या कलाकृतीचा आनंद घ्यावा आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले.