8.3 C
New York

Maharashtra Elections : बंडोबांचं अर्धशतक! भाजपला सर्वाधिक टेन्शन; काँग्रेसही हैराण

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आता बंडखोरांची (Maharashtra Elections) मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत या बंडोबाना थंड करून आपल्या उमेदवारांचा मार्ग सोपा करायचा अशी रणनीती महाविकास आघाडी आणि महायुतीने आखली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत बंडखोरीची समस्या जास्त आहे. त्यामुळ देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) नुकतीच एक बैठक घेतली. या निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली आहे.

सध्या या बंडखोर उमेदवारांनी महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. महायुतीचे ३६ तर आघाडीचे १४ बंडखोर उमेदवार मैदानात आहेत. अशात दोन्ही आघाड्यांचे नेते अर्ज माघारीची मुदत संपण्याची वाट पाहत आहेत. या दरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बंडखोर उमेदवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मतांचं विभाजन होऊ नये यासाठी हे महत्त्वाचं होतं.

गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट (Mumbai News) घेतली. यानंतर अजितदादांनी चिंचवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नाना काटे यांचीही भेट घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षातील आपल्या सहकारी नेत्यांची एक बैठक घेतली. काही बंडखोर उमेदवारांशी संपर्क देखील केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सहकारी नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांनी देखील अशाच पद्धतीच्या बैठका घेतल्या आहेत. आता अर्ज माघारी घेण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बंडखोर उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्यात 12 जागांवर नावांची गुगली; योगायोग की राजकीय डावपेच?

Maharashtra Elections सर्वाधिक बंडखोरी भाजपात

या निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता दिसत आहे. कारण सर्वाधिक १९ बंडखोर उमेदवार भाजपचेच आहेत. यानंतर शिंदे गटातील १६ आणि अजित पवार गटाचा फक्त एक जण बंडखोर आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्येच झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे १० जण बंडाचा झेंडा घेऊन मैदानात आहेत. उर्वरित ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.

महाविकास आघाडीतील १४ बंडखोरांव्यतिरिक्त आणखी काही उमेदवारांनी कुर्ला, दक्षिण सोलापूर, परांडा, सांगोला आणि पंढरपूर येथून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गटातील बंडखोरांनी अशा मतदारसंघातून अर्ज भरले आहेत जिथे भाजपचे उमेदवार आहेत. नवी मुंबईतील ऐरोली, अंधेरी ईस्ट, पाचोरा आणि बेलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

भाजपातील बंडखोर शिवसेनेच्या दोन मतदारसंघात लढत आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि कर्जत. बुलढाणा, जालना आणि बोरिवली मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपातील ९ बंडखोर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकमेव बंडखोर उमेदवाराने नांदगाव मतदारसंघात लढत आहेत. येथे समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला आहे.

Maharashtra Elections महाविकास आघाडीही संकटात

महाविकास आघाडीत काँग्रेसचे चार बंडखोर ठाण्यातील एकाच मतदारसंघातून लढत आहेत. ठाकरे गटातील बंडखोर मानखुर्द भागात लढत आहेत. वर्सोवा आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्येही ठाकरे गटात बंडखोरी झाली आहे. धारावी मतदारसंघातून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहिण ज्योती यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या बंडखोर उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img