वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पक्षाने आज त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत.
तसेच विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये आयसीयूमधून करू नयेत असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
बंडोबांचं अर्धशतक! भाजपला सर्वाधिक टेन्शन; काँग्रेसही हैराण
खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वात आधी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. ते या राज्याचे नेते आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य मला कुणीतरी सांगितलं. पण ते सत्यावर आधारीत नाही. कारण कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही.