13.8 C
New York

Sanjay Raut : भाजपकडून उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Published:

महाराष्ट्रातील पोलीस महासंचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत मात्र तरी देखील त्यांना पदावरून हटवण्यात येत नाही अशी टीका आज माध्यमांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर केली आहे. ते आज मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) प्रकरण, बोगस आधार कार्ड प्रकरणावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी वारंवर होत आहे. मात्र निवडणूक आयोग म्हणते ते आमच्या हातात नाही, एकीकडे दुसऱ्या राज्यात पोलिस संचालक बदलतात. महाराष्ट्रातील पोलीस महासंचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, त्या निष्पक्षपणे काम करत नाहीत, विरोधकांना त्रास देतात असा आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील पोलीस दल हे दबावाखाली काम करत आहे. कारण त्यांना आदेश देण्याचे काम रश्मी शुक्ला करत आहेत. आमच्या कार्यकर्त्या तडीपार करुन निवडणूक आपल्या ताब्यात घ्यायची आणि याच्या सूत्रधार राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत. निवडणूक आयोगाला वारंवार सांगत आहोत की जर राज्यात पारदर्शक पद्धतीने निवडणूका करायच्या असतील तर रश्मी शुक्ला यांना हटवावेच लागेल. असं देखील संजय राऊत म्हणाले. तसेच निवडणूक आयोग रश्मी शुक्ला यांना का हटवत नाही ? असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला.

‘अरविंद सावंत मला माल म्हणाले’; ऑडिओ ऐकवत शायना एनसींचा खळबळजनक आरोप

तर बोगस आधार कार्डच्या माध्यमातून बोगस मतदान घुसावयाचा प्रयत्न सुरू असून हा भाजप आणि त्यांच्या आयटी सेलने उपक्रम सुरु केला आहे. असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी भाजपवर केला. तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा पराभव ठरलेला आहे. यावेळी जनतेने ठरवलंय की यांना हरवायचं आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत भाजप आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या उमेदवारांपर्यंत 15 ते 20 कोटी रुपये पोलिसांच्या सुरक्षित पोहोचवले आहेत. असं देखील माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपने उमेदवारांना अर्धे पैसे अगोदर पोहतवलेत आणि अर्धे पैसे नंतर पोहोचणार आहेत. असं देखील ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img