13.8 C
New York

Sharad pawar : 20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा

Published:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला (Sharad pawar) निवडणूक आयोागाकडून दिलासा मिळाला आहे. ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे ‘तुतारी’ हे निवडणूक आयोगाने मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचे नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख तुतारी असा करण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळणार आहे. (Big decision of the election commission for the assembly elections ncp sharad pawar.)

ट्रम्पेट या चिन्हाचा लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. तसेच सातारा लोकसभेची जागा ट्रम्पेट आणि तुतारी या दोन चिन्हांमध्ये गोंधळ झाला म्हणून गेली, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करत होते. साताऱ्यातील या अपयशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे याबाबत अनेक मागण्या केल्या होत्या. मात्र, काही निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला नाही. मात्र याबाबत आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अर्ज बाद होताच करुणा शर्मा ढसाढसा रडल्या, धनंजय मुंडेंना म्हणाल्या

मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती, त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन लढले या चिन्हाच मराठीमध्ये भाषांतर तुतारी असे केले होते. काही लोकसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने या ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेल्या उमेदवारांना मिळाली आहेत. सातारा लोकसभेत याचा मोठा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसला होता. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने राज्याच्या निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. यावरुन एस चोकलिंगम राज्याचे निवडणूक अधिकारी यांनी आता राज्यातील अधिकाऱ्यांना नवीन आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img