13.8 C
New York

Mahim Constituency : माहीमचा तिढा वाढला! CM शिंदेंशी चर्चेनंतरही सरवणकर ठाम

Published:

महायुतीत माहीम मतदारसंघावरून (Mahim Constituency)  चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. या मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. भाजपने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने येथे थेट सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे. आता लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा लक्षात घेऊन या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. तरी देखील सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. या मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. याआधी सदा सरवणकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यांनी वरिष्ठ नेत्यांची ऑफर स्वीकारली नाही.

20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा

यानंतर काल वर्षा निवासस्थानी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. सदा सरवणकरांनी मतदारसंघातून उमेदवारी मागे घ्यावी यासाठी एकनाथ शिंदेंनी त्यांना काही सूचना दिल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत पुन्हा एकदा विचार करा. आपल्याला युती धर्म पाळावा लागेल अशी आठवण त्यांनी सरवणकरांना करून दिली. तरीदेखील सदा सरवणकर यांनी आपली भूमिका बदललेली नाही अशी माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img