शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यातच बारामतीमध्ये (Baramati) एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार येणार आहे आणि या सरकारमध्ये आपल्याला चांगलं पद मिळणार आहे असे भाकीत वर्तवले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, जनतेच्या फायदेसाठी आम्ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली मात्र विरोधक आज खोटा प्रचार करत आहे की ही योजना बंद होणार मात्र ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी बोलताना दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील या सरकारने मदत केली आहे. सरकारने दुधाला दर वाढवून दिले आहे असं देखील अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे काटेवाडी येथील निवासस्थानी या वेळी अजित पवार यांच्याकडून दिवाळी पाडवा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करणार आहे.
राजकीय फुटीनंतर आता कुटुंबातही फूट, यंदा पवार कुटुंबाचा वेगवेगळा पाडवा
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्याला काम करायचा आहे. मी कामाचा माणूस आहे. लोकसभा निवडणुकीत काय झालं, कसं मतदान झालं हे तुमचा अधिकार आहे. तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं असं देखील अजित पवार म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये काही झालं तरीही महायुतीचं सरकार येणार येणार येणार, तिथं आपल्याला चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार असं देखील अजित पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे सर्वांना धक्का देत बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे