अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे (Bibek Debroy) अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाणारे, देबरॉय यांनी देशाची आर्थिक धोरणे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी डॉ. देबरॉय यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचे अंतरंग आणि शैक्षणिक चर्चेची त्यांची आवड मला नेहमी लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झालं. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.
4 भारतीय कंपन्यांसह तब्बल 400 संस्थांवर अमेरिकेने घातली बंदी, ‘हे’ आहे कारण