राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही दुसरी दिवाळी आहे. (Baramati) दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्यावतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या (Pawar Vs Pawar) शुभेच्छा स्विकारतात. (Diwali) यंदाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडली आहे. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे.
महाराष्ट्रात राजकीय दिवाळीचा विषय निघाला की शरद पवारांच्या घरची दिवाळी. बारामतीमधील गोविंदबागेतील दिवाळी सर्वांनाच आठवते. दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करते. यंदा मात्र, येथेही पवार कुटुंबात फूट पडल्याचं आहे. पक्षात फूट पुडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबातील व्यक्तींचं विभाजन झालं आहे. आता तर विधानसभा मतदारसंघात थेट काका विरुद्ध पुतण्या अशी म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होणार आहे. त्यामुळे पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झाला आहे. पवार कुटुंब आणि बारामतीकरांच्या भेटीगाठी दिवाळीनिमित्त ही प्रथा आता पंरपरा झाली आहे.
माहीमचा तिढा वाढला! CM शिंदेंशी चर्चेनंतरही सरवणकर ठाम
पाडव्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. शरद पवार आणि कुटुंबियांना सत्ता असो वा नसो, पण दिवाळीच्या शुभेच्छा देणे, त्यांची भेट घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे हा सिलसिला कित्येक वर्षांपासून सुरु आहे. यंदा कार्यकर्त्यांची गर्दी होते.यंदा पवार कुटुंबाचे दोन पाडवे बारामतीत होणार आहे. याआधी शरद पवार फक्त गोविंद बागेमध्ये पाडवा घ्यायचे परंतु अजित पवार उद्या काटेवाडीमध्ये पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांना भेटणार आहेत.गोविंद बागेत शरद पवारांचा दिवाळी पाडवा हा होईल तर काटेवाडी येथे अजित पवारांचा पाडवा हाहोणार आहे. बारामतीत यंदा दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केले आहे.
Pawar Vs Pawar गोविंद बागेत प्रचंड गर्दी
दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंदबाग हे अतिशय वेगळं समीकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड गर्दी पाडव्या अगोदरच आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहायला मिळत आहे.